THE PEOPLES IMPROVEMENT TRUST(Regd)
(Founder-Dr.Babasaheb Ambedkar-1944)
� legal side of Dr Babasaheb Ambedkar bhawan
दबाबांच्या लेकरांनो, वाचा आणि विचार करा !!!
दिनांक 19 तारखेचा मोर्चा कशासाठी ?
- हा मोर्चा सत्ताधार्यांच्या /ब्राम्हणवादी व्यवस्थेच्या विरोधात आहे की आपल्यातीलच एका व्यक्तीच्या विरोधात आहे ?
- हा मोर्चा न्याय मिळविण्यासाठी आहे की एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करून सुड घेण्यासाठी आहे ?
- हा मोर्चा सामाजिक चळवळ बळकट करण्यासाठी आहे की, एक व्यक्तीनियंत्रीत संस्था व कुटुंबीय यांनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे नियमित करण्यासाठी आहे ?
- हा मोर्चा सामाजिक उपयुक्ततेसाठी आवश्यक असलेली वास्तू उभी करण्यासाठी आहे की, ही वास्तू निर्माण होऊ नये म्हणून अडथळा करण्यासाठी आहे ?
- हा मोर्चा लोकशाहीचे आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी आहे की लोकशाही आणि कायदा धाब्यावर बसविण्यासाठी आहे ?
- हा मोर्चा वाद मिटवून मार्ग काढण्यासाठी आहे की स्वत:च्या अहंकाराचे प्रदर्शन करण्यासाठी आहे ?
- शांती, सामंजस्य आणि सामोपचाराने दोन्ही पक्षांनी दोन पावले मागे घेतली तर अजूनही तोडगा निघेल. असे न करता भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरून समाजात गोंधळ पसरवून काय साध्य होणार आहे.
- आपण सर्वजण बाबासाहेबांची लेकरे आहोतं आपल्या बापानी म्हणजेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्याचे आपण पालन करणार की बाबासाहेबांचा कायदा ठोकरून लावणार ?
वाचा, विचार करा ! विवेकबुद्धीचा वापर करा !! भावनिक होऊन कोणाच्या हातचे बाहुले बनू नका !!!