THE PEOPLES IMPROVEMENT TRUST(Regd)
(Founder-Dr.Babasaheb Ambedkar-1944)
दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (TPIT) डाँ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे वास्तव
दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (TPIT) च्या अधीन असलेल्या दादर पूर्व येथील जमिनीवर १९६७ पासुन माध्यमिक शाळेचे आरक्षण होते. यामुळे या जमीनीवर बहुउपयोगी सभागृह व चळवळीस उपयुक्त अत्याधुनिक इमारत बांधण्यास अडथळा निर्माण झाला होता. यामुळे ट्रस्टने महाराष्ट्र शासनास विनंती करून आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता केली. यामुळे हे आरक्षण महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक ३ डिसेंबर २०१५ नुसार बदलून पब्लिक हॉल आणि इन्स्टिट्यूशनल यूज असे झाले आहे.
या ठिकाणी आत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय, सार्वजनिक सभागृह, ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, धम्म प्रशिक्षण केंद्र, कायदा सहाय्यक केंद्र, अन्याय-अत्याचार निवारण केंद्र, महिला सबलीकरण, विद्यार्थी, ग्रामिण भागातून औषधं-उपचारांसाठी आणि इतर तातडीच्या कामासाठी येण्याऱ्या समाज बांधवांसाठी तात्पुरता निवास व इतर सामाजिक बाबीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
ट्रस्टने नव्याने नियोजन, बांधकाम आराखडा तयार केला व त्या १७ मजल्याच्या सामाजिक केंद्राच्या आराखड्यास मुबई महानगर पालिकेने मंजुरी दिली (पत्र क्र FB/HR/RII/267 दिनांक १८ मार्च २०१६ व पत्र क्र. EB/8644/FS/A दिनांक १३ एप्रिल २०१६). त्या नुसार जुने बांधकाम निष्कासित करून (डीमोलेशन) करून नवे बांधकाम सुरु करण्यास अभिप्रेत आहे. सदर बांधकाम संकल्पाचा शुभारंभ Dr. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल २०१६ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर नियोजन आराखड्यात सध्या अस्तित्वात असलेले पक्ष कार्यालये, भारतीय बौद्ध महासभा कार्यालय, प्रिंटिंग प्रेस यांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
ट्रस्टने १२ मे २०१६ रोजी मा. भीमराव आंबेडकर यांच्याशी चर्चा करून नियोजना बाबत विस्तृत माहिती दिली व प्रकल्पाविषयी सादरीकरण केले तेव्हा त्यांनी सदर प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले.
महापालिकेच्या सुचनेनुसार BMC पॅनेल मधील स्ट्रक्चरल इंजिनियरचा अहवाल सादर केला व त्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकाऱयांनी पाहणी करून ३५४ ची नोटीस दिनांक १ जुन २०१६ रोजी जारी केली (Letter no. ACFC/354/BF/003/2016) व त्यात स्पष्ट म्हटले कि ३० दिवसाच्या आत तुम्ही जर बांधकाम तोडले नाही तर ट्रस्ट वर फॊजदारी कारवाई करण्यात येईल.
सेक्शन ३५४ अंतर्गत अटींची पूर्तता करण्यासाठी मा. महानगरपालिका आयुक्त, अग्निशमन दल, महानगरपालिका जलअभियंता, BEST तसेच स्थानिक पोलिसांना देखील रितसर कळविण्यात आले होते (दिनांक ३ जुन २०१६, २१ जुन २०१६).
सेक्शन ३५४ ची नोटीस सर्व गैर-ट्रस्ट आस्थापनांना रजिस्टर पोस्टाने कॅविएटद्वारे पाठवण्यात आली व महानगरपालिकेने देखिल नोटिस जागेवर लावली.
व त्यानुसार प्राप्त परिस्थितीत निष्कासनाची कारवाई करण्यात येत असतांना प्रेस असलेल्या इमारतीचा थोडासा भाग अनावधानाने धक्का लागल्याने ढासळला. प्रेसची इमारत व मशीनरी सुस्थितीत त्याच जागेवर आहे.
ट्रस्टने अनेक वेळा चर्चा करण्याची विनंती केली व अजूनही सकारात्मक चर्चा करण्यास तयार आहे.
परमपूज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी, नवीन डाँ. आंबेडकर भवनाच्या स्वरूपात समाज विकासाचे कंमाड सेन्टर निर्माण करणे हेच आपणा सर्वांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. परिवर्तन आणि प्रगतीसाठी नवनिर्माण करणे आवश्यक आहे हे सत्य तथागत गौतम बुध्दांनी विशद केले आहे. त्यामुळे ह्या संकल्पाला आपण सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती.